Cart is empty

Shabd Mi Gumfit Jaato

Author: Hemant Mahadev Kulkarni

Book Cost

Original price was: ₹229.Current price is: ₹200.

नमस्कार मित्रांनो. माझा हा दुसरा कविता संग्रह तुम्हा प्रिय वाचकांच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. माझा या आधीचा संग्रह 'सहा ऋतूंचे सहा सोहळे' जितक्या आवडीने वाचला गेला, तितकेच प्रेम या पुस्तकाला लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

Share this Book

WhatsApp
Facebook
Twitter

Original price was: ₹229.Current price is: ₹200.

Quality Products

7 Days Return Policy

Usually Ships in 2 Days

Have a Coupon Code?

 Apply At Checkout

Page Count

102

Book Type

Paperback

ISBN

9788196743673

Mrp

229

Genre

Poetry

Language

Marathi

About the Book

नमस्कार मित्रांनो. माझा हा दुसरा कविता संग्रह तुम्हा प्रिय वाचकांच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. माझा या आधीचा संग्रह ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ जितक्या आवडीने वाचला गेला, तितकेच प्रेम या पुस्तकाला लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना! या कविता संग्रहातही, मी एकाच विषयाच्या, किंवा एकाच प्रकारच्या कविता सामाविष्ट करणे कटाक्षाने टाळले आहे. तोचतोचपणा आल्यास, ते वाचन कदाचित कंटाळवाणे होण्याची शक्यता असते, अशी माझी धारणा असल्याने, मी विविध विषय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रचना या संग्रहात अंतर्गत केल्या आहेत. त्यामुळे वाचकांची निखळ करमणूक होईल ही आशा आहे. भावगीते, गझल, लावण्या, मुक्तछंद, इत्यादी प्रकारची काव्ये तुमच्या पसंतीस उतरतील अशी मला खात्री वाटते. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘क्रिमिनल’ या हिंदी चित्रपटालील एक अतिशय गाजलेले गाणे ‘तू मिलें, दिल खिलें’ आपल्याला आठवीत असेलच. त्या गाण्याच्या चालीशी अतिशय चपखलपणे जुळणारे ‘तू मला, मी तुला’ हे मराठीत केलेले गीत जरूर वाचा. तसेच, ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ ह्या लोकप्रिय मराठी गीताचे ‘तुझ्या गोळ्या, माझ्या गोळ्या’ हे गंमतशीर विडंबन ही तुम्हाला नक्कीच आवडेल. जे मला सतत काव्य करण्याची शक्ती आणि स्फूर्ती देत रहातात, त्या श्री दत्तगुरुंच्या एका आरतीने मी या काव्य संग्रहाची सुरुवात केली आहे. पारंपारिक आरत्यांच्या साच्यात चपखलपणे बसणारी ही आरती माझ्या हातून त्यांनी केवळ दहा मिनिटात लिहून घेतली, ही देखील त्या माउलीची माझ्यावरील एक कृपाच म्हणावी लागेल. असो. वेळात वेळ काढून आपण हे पुस्तक वाचाल, आणि आपले अभिप्राय मला आवर्जून कळवाल, अशी आशा करतो. लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा, ही विनंती. हेमंत महादेव कुलकर्णी

About the Author

Shopping Basket
Home
Shop
Cart
Plans
Account